
कविता - ओंजळीतलं सुख
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
जणू सुख पेरून मातीत,
भार देवावरी टाकला...
फुटले अंकुर, मनाला,
आशेला, बहर आला...
काळीज सुपाएव्हढं झालं,
अन् उभं आभाळ बरसलं...
ओंजळ भरून ओटी भरली,
तिन्हीसांज गोड शहारली...
चिंतेने भेगाळल्या जीवा,
किती सुखद शिंपण वाटे...
शितल थंड, वा-या-सवे,
अंगोपांगी संवेदना जागे...
डोळे नभाचे पाणावले...
रिमझिम पावसात चिंब,
अमृताचे रोपटे लावले...
सोनेरी मोत्यांनी डवरलेले...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply