कविता : 🌷" भरून येईल ऊर "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १७ जुलै २०२४
आज आषाढी एकादशी...
पंढरीच भक्तांसाठी काशी
दिसे जळी-स्थळी-पाषाणी,
सर्वत्र व्यापून तो चक्रपाणी...
या भुवरी वैकुंठ अवतरेल...
टाळ-मृदुंग-विणा निनादेल...
"जय-जय-रामकृष्ण-हरि"...
संपूर्ण, दुमदुमेल पंढरपुरी...
माऊली-विठू-हे-माऊली,
करी कृपेची-सदा सावली...
जयघोष करीत भक्त-जन...
अर्पण करुनी तन-मन-धन...
वाद-विवाद सारे विरघळून...
लेझीम नृत्य होई समरसून...
पावन भूमीत चंद्रभागे-तीरी...
वाळवंटी नंदनवन उभे करी...
पंढरपुरी अंगणी भक्तिला-पूर
ज्ञानियांचा राजा-संत-कोहिनूर
वाळवंटी फुले भक्तिचा मळा
वीटेवरीच उभा, विठू-सावळा
गोळा होतील दूर-दूरुनी संत
विरेल भक्तीतूनी अवघी खंत
संतांचे जणू माहेर-हे पंढरपूर
दर्शन-लाभे भरून येईल ऊर...
उभे रखुमाई समवेत पांडुरंग...
अंतरंगी तरलतम अनंत तरंग...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply