कविता :🌷' कणखर-बाणा '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, २३ जुलै २०२४
वेळ : सकाळी, ११ वाजून ३० मि.
" स्वराज्य हा माझा जन्म-सिद्ध अधिकार आहे, आणि
तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना केली टिळकांनी
टिळक, भारतीय-स्वातंत्र्य-लढ्याचे अत्यंत महत्त्वाचे नेते
ब्रिटिशांनी त्यांना"भारतीय असंतोषाचे जनक"असे म्हटले
शाळ-करी वयातही चुकीची गोष्ट लादल्यावर,अमान्य केली
"शेंगांची टरफले उचलणार नाही"ही गोष्ट स्पष्टच सांगितली
बालवयातही अन्यायाबाबत चीड असल्याची ती होती खुण
सडेतोड परखड बोलणे, करारीपणा, हे त्यांचे, स्वभाव-गुण
योग्य-जरुरी-विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,
केसरी, मराठा या वर्तमान-पत्रांतून ब्रिटिशांवर तोफ डागली
'राजद्रोह'-आरोपाखाली मंडाले-तुरुंगात त्यांची रवानगी केली
कारागृही असूनही " गीतारहस्य "ही अमूल्य ग्रंथ-रचना केली
लोकांना संघटित करुन एकतेचा भाव निर्माण करण्यासाठी,
सार्वजनिक गणपती व शिवजयंती उत्सवांची सुरुवात केली
भावी नवनविन-पिढींवर देशभक्तिचे संस्कार व्हावेत यासाठी,
न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज सुरू केले, शिक्षणासाठी
जन-जागृती,आयुष्यभर जनसेवा, वेतन न घेता ज्ञानदान केले
लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य-लढ्या-विषयी जागरूक केले
स्वातंत्र्य-सेनानी,लेखक,संपादक,शिक्षक-हे चौफेर व्यक्तिमत्व
लोकांनी लोकमान्य-पदवी बहाल केली,ज्यांनी रूजविले स्वत्व
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल
चळवळ उभारली यांनी सम-विचारवंत-त्रिकूट, लाल-बाल-पाल
लोकमान्य टिळक हे नाव घेता, त्यांचा कणखर-बाणा आठवतो
उफाळून देशप्रेम मनी, देशभक्तिचा सरसरून काटा उभा राहतो
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply