🌷कविता : " ओलाव्याचा मागमूस "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १० जून २०१६
वेळ - रात्री, ७ वाजून ४१ मि.
पूर्वी चार काळे ढग एकत्र आले,
की मुसळधार पाऊस पडायचा ...
आता आभाळ ढगांनी अंधारले
तरी थेंब गळत नाही, एकसुध्दा ...
पूर्वी, विहिरीत नुसता हात जरी टाकला,
तरी पाणी भरभरून स्पर्श करी हाताला ...
आता पार बुडाशी जाऊन बसल्यावरही,
साधी ओंजळही पाण्याने, भरतच नाही ...
पूर्वी, माणसाच्या खांद्यावर हात ठेवला...
की आपुलकीचा झराच वाहू लागायचा ...
आता कोणी ह्रदयाला हात घातला जरी,
तरी अंतरी, ओलाव्याचा मागमूसच नाही ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆