I use this space to catalog the poems written by me.
Hope you enjoy them.
About Me
I am Tilottama Lele a poetry enthusiast.
By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.
Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.
Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.
कविता : 🌷" मानस-वारी " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
एकाच स्थितीमध्ये चित्त, मन, शरीर, बुद्धी कंटाळते विरंगुळा म्हणून स्थिती बदलायला धडपडत असते कधी हवा-पालट म्हणून थोडी गंमत, हवीशी वाटते कधी तीर्थ-क्षेत्र-दर्शन-यात्रेची आतुरता वाटत असते
आषाढी एकादशीला पंढरपूरला भक्तिभावाला पूर येतो भारतभरातून सर्व स्तरांतून भक्त-समूह पायी-पायी येतो लाखोंच्या संख्येने नाचत-गात 'स्व'चे भान विसरुन येतो स्त्री-पुरुष-आबाल-वृद्ध-शेजारी-पाजारींच्यासह पोहोचतो
ज्या ज्या कुणाला तीव्र इच्छा असूनही ती मारावी लागते, त्यांचे फक्त शरीर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असते, मन मात्र दिवस-रात्र वारकरी संप्रदायाबरोबर फिरत असते पंढरपूरी विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनासाठी आसुसलेले असते
मनात तीव्र इच्छा असता 'मानस'-यात्रा सहजच घडू शकते त्यासाठी आंतरिक ओढ-खरी तळमळच फक्त जरुरी असते मनस्वी-ओढीने सूक्ष्म-शरीर जगाच्या पाठीवर पोहोचू शकते कैलास मानसरोवर यात्रा करुनही-पंढरपूरची-वारी पूर्ण करते
किती जवळ असूनही, किती योजने दूर मी, ” नेमके काय बिनसले,” भंडावलो प्रश्नानी, कधी प्रश्नांवर प्रश्न मनांतरी रेंगाळतात अन् गुलदस्त्यातून उत्तरे खदा-खदा हसतात…
भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस
सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी
दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत
You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.