
कविता : 🌷 "दंवात भिजली पहाट..."
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आठवणींची शत-शत-लक्ष फुले...
वेचता-वेचता मन मयूरासम डोले...
मनी चांदण्यांची, फुले उमलली...
सोनेरी कवडसे, पाऊले उमटली...
बकुळीच्या गंधाने, कळी खुलली...
नखशिखांत गोड शिरशिरी उठली...
कोमल मखमली, स्पर्श अंथरूनी...
हृदयातील सुगंध, दरवळे मन्मनी...
थंडी-गुलाबी लांब क्षितीज घनदाट...
प्रित लाजरी, दंवात भिजली पहाट...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















