Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता : 🌷 ” चौफेर प्रतिबिंब शिवाचे “

कविता : 🌷 " चौफेर प्रतिबिंब शिवाचे "

कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र
शिव-पार्वती विवाह म्हणून 'महा-शिवरात्र'
पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक, बिल्वपत्र
झळकतो वैश्विक उर्जेचा प्रचंड स्रोत सर्वत्र

अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला,
थेट स्वर्गातून पृथ्वीवरती आणले गंगेला
शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला, 
म्हणून 'गंगाधर' नावानं ओळखला गेला

अमृत-मंथनात चौदावं रत्न, हे जहरी विष निघालं
भोळ्या शंकरानं ते 'हलाहल’ प्राशन करुन टाकलं
सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं
तेव्हापासूनच 'नीलकंठ' हे नावही त्यालाच मिळालं

शिव-तांडव नृत्य, जगात आहे सुप्रसिध्द
निसर्गही हवं ते देतो, भरभरुन मुक्तहस्त
कधी कोपला तर मात्र, होऊन-अति-क्रुद्ध,
थैमान घालून तांडव-नर्तन करतो, संत्रस्त

शिव-शंकर-भोलेनाथ, हे-निसर्गाचं-जणू-प्रतिकात्मक-रूप- खास
सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनीच सृष्टीचा विनाश
त्रिलोचन-सदाशिव तिसरा डोळा उघडून तांडव करी विनासायास
एक निसर्गाचं 'रौद्र रूप' अन् दुसरें 'रूद्र-निर्मित' भयंकर सर्वनाश

कैक पवित्र शिवालयं अत्यंत दुर्गम भागात उभी राहिली
अमरनाथ, केदारनाथादि तीर्थक्षेत्रं, पर्वत-कुशीत वसली
भीमाशंकर, तुंगारेश्वर आदि घनदाट अरण्यात विसावली
निसर्ग-संरक्षणामुळे मानवी-अस्तित्वाची पताका टिकली

'सत्यम् शिवम् सुंदरम्' हे विशेष प्रतिक आहे निसर्गाचे
त्रिनेत्र, भालचंद्र, गंगाधर, नीलकंठ, रुद्रादि नाव तयाचे !
पशू-पक्षी, वृक्ष-वल्ली, वनराई, नद्या, झरे, अवघी सृष्टी
संवेदनशिल मनात चौफेर पडेल, प्रतिबिंब शिवाचे दृष्टी !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!