Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता :🌷 भ्रम आणि वस्तुस्थिती

कविता - भ्रम आणि वस्तुस्थिती

कविता :🌷 भ्रम आणि वस्तुस्थिती
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

खूपदा माणसाच्या डोक्यात वेगळी हवा शिरते,
वाटते, "पान हलत नाही आपल्यावीण कुणाचे..."

प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती फारच निराळी असते...
भ्रामक-कल्पनांच्या विश्वात-भ्रष्ट मति गुंग असते...

कुणीही आहे म्हणून किंवा कुणी नाही म्हणूनही,
विश्वातील कोणाचं, कधीही काहीच अडत नाही...

चंद्र-सूर्य-वृक्ष-वेली-फुलं-पानादि सृष्टीचे ऋतु-चक्र,
चोखपणे पाळतात, निसर्गाने-आखलेले-वेळापत्रक...

अडत नाही आई-विना, पोरा-बाळांचं सुध्दा काही...
प्रेमळ कुणी नंद-यशोदा अत्यंत मायेने सांभाळती...

पत्नी नाही म्हणून विधुराचंही कांहीच नाही अडत...
शुभ-कार्यी कनवटीला सुपारी लावून काम भागतं...

पति‌वीण विधवा स्त्रीचंही तसं फारसं अडत नाही...
ओटीत श्रीफळ ठेऊन साधू शकते ती कार्यसिद्धी...

असे असूनही, वात्सल्य-प्रेमभावच प्रभावी ठरतात...
एक-एकटे पति-पत्नी, कर्तव्य निभावंतंच जगतात...

पत्नीच्या पश्चात मुलांचे आई-व-बाप दोन्ही होतात...
आईची उणीव लेकरांना, अजिबात भासू न देतात...

पति नाही म्हणून, स्त्रिया पेलतात संपूर्ण जबाबदारी...
नोकरी-व्यवसाय सांभाळूनच मुलांवर सुसंस्कार करी...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!