Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता  : 🌷 ” पावती “


कविता  : 🌷 " पावती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

साफ-सफाईचा दिवस, म्हणून कपाट उघडले…
हे जुनं कपाट होतेच एकदम भरगच्च भरलेले…

मनामध्ये म्हटले, ही बेगमी पूर्ण दिवसभराची
जणू आठवणींच्या विश्वात, सुसंधी रमण्याची...

फडताळात डोकावतां हाती लागले एक गाठोडे,
अवती-भवती जुने-पाने होते सारे कपडेच-कपडे…

आतलं घबाड काय, उत्सुकता शिगेला पोहोचली
म्हणून सरळ गाठोडे, उपसायलाच सुरुवात केली

तर "तीळा तीळा दार उघंड" म्हणायचा अवकाश,
सताड-उघडा जरतारी-कपड्यांचा जणू खजिनाच…

कुंची, विविध रंगी शालू-शेले अन् भरजरी पैठणी…
जी प्रत्यक्षात सोन्याच्या तारेने नक्षीकाम केलेली…

देवच जाणे, गेल्या किती पिढ्यांना पुरून उरलेली…
नजरेत भरणारी अस्सल, जराही न काळवंडलेली...

कदाचित म्हणूनच म्हणत असावेत, "जुनं ते सोनं"
तकलादू, बेगडी, बनावट, असे त्यात काहीच नाही

न राहवून, उचलून मायेचा-वास-घेतच, ती पांघरली
कितीक वर्षं वितळून, आईच्या कुशीत जाग आली...

गतस्मृती ताज्या-होऊन, वर्तमानाची जाणीव झाली
आईच्या आठवणींची डोळ्यांनी-हळुच-पावती-दिली

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!