Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता:🌷”श्वेतांबरधरा”


कविता : 🌷 " श्वेतांबरधरा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्विनीम्॥

नंद पर्वतावर राहणारी हिमालय-पुत्री
सुप्रसन्न होता अमोघ-शक्तिंची-दायित्री
भक्तांचे ज्ञानानुभव, वृद्धिंगत करणारी
एकूण-अठरा-सिद्धिंची वरदायिनी देवी ...

चतुर्भुजा-त्रिनेत्रा, बुद्धिमान-सुशांत देवी
उजव्या हाती त्रिशूल, अभय-मुद्रा दावी ...
शोभे वरदहस्त अन् डमरू डाव्या हाती ...
वृषभ असे वाहन, होई आरूढ त्यावरी ...

अन्नपूर्णेचं रूप धारण करुन वावरते ...
भक्तांची मनस्थिती स्थिर-प्रसन्न करते ...
चांगल्या-वाईटाचा ती समतोल राखते
आत्म्याला शुद्ध-पवित्र-अन्-शांत करते ...

संकटांना कसे पळवायचे, देवीचे संकेत ...
देवी महागौरीचा आवडता रंग असे श्वेत ...
श्वेत वस्त्रालंकार आणि वर्णही असे श्वेत
म्हणून देवीस"श्वेतांबरधरा"म्हणत असावेत

देवीचा गौरवर्ण स्वयंप्रकाशित चंद्रासमान ...
शुभ्र-कोमल, नाजूकशी, कुंदकळ्यासमान ...
देवी सन्मार्गावर-आणून देई-योग्य-दिशाज्ञान ....
जीवन होतसे सुकर, लाभून तृप्तीची खाण ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!