Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता:🌷”जन्माची व्हावी सार्थकता”


कविता :🌷" जन्माची व्हावी सार्थकता "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

अनंत संसार महासुमद्रे मग्रं समभ्युद्धर वासुदेव। 🕉️
अनंतरूपे विनियोजयस्व ह्रानंतसूत्राय नमो नमस्ते।।

🙏ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥ 🙏

अनंत-अनाकलनीय आदि, अनादि, तूचि बाप्पा मोरया
तुझ्या पवित्र आगमनाने तन-मनंही भारावले रे गणराया

तुझ्या आशिर्वचने सद्बुद्धी-सद्शक्ति-सर्वांस शांति मिळो
मनांत साचलेली जळमटे नष्ट होऊन अहंभाव पार जळो

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, बांधू "सत्कर्मांचे-अनंत-सूत्र"
ऋण फेडू-मातपित्याचे, कुटुंबीयांचे, देशाचे-होऊ-सुपुत्र

विसर्जित करु आळस-व्यसन-व्याधी, अंगी बाणू नम्रता
आप-पर-भाव त्यागू, नव-विचार, नव-चैतन्याची शुचिता

आम्ही केवळ नाम-मात्र, कर्ता-करविता, तूचि खरा त्राता
सत्कर्म-सत्कार्य घडू दे हातून, जन्माची व्हावी सार्थकता

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!