Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता : 🌷’ खरं सुख ‘

कविता : 🌷’ खरं सुख ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : मंगळवार, १८ एप्रिल २०२३
वेळ : ११ वाजून ५० मि.

” अगदी प्रत्येक घासागणिक तोंड उघडते आहे “
हे सुप्रसिद्ध बोल आहेत, आमच्या कै. काकांचे !

आईच्या हातची पुरणपोळी खातानाची मज्जा मस्त
आम्ही सगळे नकळत, जरा जास्त करत असू फस्त !

कटाची आमटी-दूध आणि लोणकढी-साजुक तूप,
सणावारी पुरणपोळीवर आम्ही ताव मारायचो खूप !

भल्या पहाटे उठून, स्वयंपाकाची जय्यत तयारी करुन 
साध्या पाट्या-वरवंट्यावरच सगळं पुरण वाटून-घोटून,

पूर्ण कुटुंबासाठी पुरणा-वरणाचा किचकट घाट घालून,
त्या माऊलीच्या चेहर्यावर मात्र आनंदच वाही ओसंडून!

फक्त एका चहाच्या कपावर इतकं राब-राब राबूनही,
सर्वांना आग्रहानं वाढल्याविना, घासही खाल्ला नाही !

सर्वजणं जेवून-विडा खाऊन ढेकर दिल्यावर तृप्तीची,
झाक-पाक-आवरा-आवर करुन मग कुठे ती जेवायची !

बहुधा अवखळ-अजाण वयामुळे कधी नाही ते जाणवलं,
स्वतः ‘आई-आजी’ झाल्यावर, त्यातलं खरं सुख उमगलं !

@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆















  • 🌷 पल-पल है जुड़ा हुआ…

    कारें-कारें बादल छाएं, आधी-अधूरी सी रात…राह तकते तकते, सहमें सहमें से जज़्बात…साये भी हैं सोये हुएं, सोया है सारा जहां…ज़श्न काहे का मनाते हम कोई भी तो हों यहां…रातों को…

    Read more: 🌷 पल-पल है जुड़ा हुआ…
  • 🌷 इक और आसमां…

    ज़िन्दगी बाक़ी है तो चलो ख़्वाब बुन लिएं जाएं…वर्ना क्या पता अचानक कब रात खत्म हो जाएं…आस्मां के उस पार भी इक और आसमां होता तो है… सिर्फ जरूरत है…

    Read more: 🌷 इक और आसमां…
  • 🌷झुळुक येता स्वच्छंदी…

    झुळुक येता स्वच्छंदी…डोलली गवताची पाती…हिरव्या गालीच्यावरती, जलबिंदूंनी केली नक्षी…झुळुक येता स्वच्छंदी…सांजवेळ बहरून आली… नयनरम्य सप्त-रंगांची, आकाशी उधळण झाली…झुळुक येता स्वच्छंदी… मळभ पळते दूरवरी…मन-पाखरे भिरभिरती…आनंदाला येईल भरती…

    Read more: 🌷झुळुक येता स्वच्छंदी…
  • 🌷पानगळीतच ‘अक्षयपण’ दडले…

    सृजन-चक्र सृष्टीचे हे अविरत चाले चाले…मृत्यु नंतर पुन्हा जन्मणे, कोणाला चुकले ? नवीन कोंभ इवले-इवले भुईतून डोकावले… आळोखे-पिळोखे देत-देत जगती अवतरले…क्षण येती-जाती क्षणभंगुर जीवन हे आपुले… क्षणा-क्षणाच्या पानगळीतच ‘अक्षयपण’ दडले…

    Read more: 🌷पानगळीतच ‘अक्षयपण’ दडले…
  • 🌷 Mind Can Work Miracles…

    When Life pulls us in many directions, We get confused due to distractions…By removing trouble-shooting obstacles, A clutter-free Mind can work miracles…

    Read more: 🌷 Mind Can Work Miracles…
  • 🌷True Peace…

    Accepting someone’s human imperfection N accepting d reality of any situation…Once this happens d path becomes open…From Within d Healing-Process happens…Black clouds from d Mind’d be vanished N in life…

    Read more: 🌷True Peace…

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!