Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता : 🌷’ सुवर्णसंधी ‘

कविता :🌷’ सुवर्णसंधी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : मंगळवार, ११ एप्रिल २०२३
वेळ : १ वाजून ०६ मि.

‘जीवन’ म्हटलं की असणारच ऊन-सावली,
तरी त्यातली चाखायला हवी क्षणिक माधुरी
हसत-हसवत मस्त जगण्यातील मजाच न्यारी 
हलक्या-फुलक्या आयुष्यातील वाढते खुमारी !

प्रत्येक दिवस हा जणू काही अंतिमच समजून,
ताण-विरहीत मनसोक्तपणे जर पाहीला जगून,
एरवी वाटणार्या त्रुटी-असुविधाही जातील पळून
जीवनातील क्षणन्-क्षण जाईल आनंदाने भरून !

किडुक-मिडुक गोष्टींवरुन होणार नाहीत वितंड वाद 
जन्मजात-कद्रु-व्यक्तीतही उदारता जागृत होई खास
गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, स्त्री-पुरुष आदि भेदाभेद 
लख्ख-प्रकाशानं जसं तम वितळतं, विरतील सगळेच !

खचितच यांमुळे आयुष्य जगण्याचा, कैफ वाढेल !
हेवे-दावे वैर-कटुता यांना अजिबात थाराच नसेल
त्यामुळे मनातला आप-पर-भाव मुळापासून संपेल
प्रत्येक जण आपलासा-हवाहवासा नक्की वाटेल !

अरण्य गाठून एकांतवास भोगणं म्हणजेच तपश्चर्या नव्हे !
वेगवेगळ्या रितीने, माणसांत राहून सुद्धा ती साध्य होते 
मात्र त्यासाठी मनाचा ठाम निर्धार करता आला पाहिजे 
चंचल-मनास मुरड घालून शिस्तीचं पालन झालं पाहिजे !

अर्वाचीन-काळापासून देव-मानव नित्य करताहेत यज्ञ 
रूढ-पध्दतीशिवायही कैक प्रकारचे असू शकतात यज्ञ !
कुणी करु शकतात वाक्-यज्ञ तर कुणी क्रियाशील-यज्ञ 
कुणी करतात लेखन-यज्ञ, कुणी सर्वप्रचलित नाम-यज्ञ !

साधना, तप, यज्ञ यापैकी काहीही मनापासून केलं तरी,
स्थूल-देहासह सूक्ष्म-पातळींवर, संस्कार होती मनावरही !
चौर्याऐंशी लक्ष योनी भटकून मनुष्य-जन्म लाभतो अंती,
त्याचं चीज करण्याची सुवर्णसंधी अजूनी आपल्या हाती !
तो सार्थकी लावण्याची सुवर्णसंधी अजूनी आपल्या हाती !

@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆



















Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!