Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता :🌷’ नखशिखान्त संवेदना ‘✅

कविता :🌷’ नखशिखान्त-संवेदना ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २९ जून २०२३
वेळ : १० वाजून ४३ मि.

ज्याचं चित्त निर्मळ-पावन
त्यास दर्शन देईल दयाघन !
ज्या मनी नाहीच किल्मिश 
त्या हृदयी वसतो जगदीश !

भुकेल्या-जीवा जे देती घास
त्यांच्या नशिबी अन्न-सुग्रास
दीन-जनां देती मदतीचा हात,
येईल त्यांच्यासाठी जगन्नाथ !

रात्रं-दिन जे गाळतील घाम,
तेच भक्त पावतील निजधाम !
दुर्बल-जनांची जे ठेविती जाण,
त्रिदेव रक्षिती त्यांचे पंच-प्राण !

स्वार्थ सोडून, परोपकार करी
त्यांच्या-पाठीशी सदैव श्रीहरी
किर्ती-धन-सुख, नसे ज्या खंत
त्या साठी सर्वत्र, उभा भगवंत !

ज्यांनी भक्ति-मार्ग चोखाळला
त्यांचा मुक्ति-पथ सुकर झाला !
जो आहे जळी-स्थळी-पाषाणी 
स्वर्ग-पृथ्वी-पाताळी, चक्रपाणी !

भूमी-जल-व्योम व्यापून टाकी 
म्हणूनच त्या म्हणती सर्वव्यापी !
मत्स्य-कूर्म-वराहादी दशावतार
खांबातून प्रकटला नृसिंहावतार !

‘वाल्या’सारखा जो डाकू अट्टलं,
नामस्मरणजपे भेटे त्यास विठ्ठल !
सुख-दु:ख-मोह-माया-देह, नश्वर
नखशिखान्त-संवेदना आहे ‘ईश्वर’ !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

























Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!