Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कवितेचं नाव-🌷” सु-संस्कारांचं सिंचन “…

तारिख – ३० डिसेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷” सु-संस्कारांचं सिंचन “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले

तेव्हाची गोष्ट आहे ही …
सर्वां,असं वाटायचं,की …

जेव्हा पालक आणि पाल्यं,सर्वांनाच,
” गाईड्स “वापरणं, नामुष्कीची गोष्ट,
“कोचिंग-क्लासला”जाणं,शरमेची-गोष्ट …

जेव्हा शिक्षक,”टुशन्स”साठी धडपडायचे नाहीत,
किंवा तसा सल्लाही विद्यार्थ्याना द्यायचे नाहीत

“शिकवणं”हा एकमेव,”नोबल- प्रोफेशन” …
असं सर्व-सामान्यपणे,प्रत्येकास वाटायचं …
वास्तवीक,आजच्या तुलनेत,तेव्हा शिक्षक,
मासिक-वेतनाच्या बाबतीत,खूपच उपेक्षित …

तरीही,त्यांचं शिकवणं,पोट-तिडीकिनं,
नेहमी असायचं,अत्यंत आपले-पणानं,
आपल्या हातूनच नवीन-पिढी घडतेय …

भविष्यातही घडणार आहे,
अशा एकाच,उदात्त भावनेनं
भारलेला,असा तो शिक्षक-वर्ग …

निदान सर्व शाळांमध्ये तरी,प्रामाणिकपणा,
कडक-शिस्तं असूनही मायेचा,आपलेपणा

हेड-मास्तर व शिक्षक यांचं एकमेव ध्येयं,
“उत्तम- विद्यार्थी “चांगले-नागरिक घडवणं …

त्यामुळं सतत सुंदर कल्पना,
नवं-नवीन गोष्टिंच्या योजना …

अभिनव प्रयोग,संकल्प,उपक्रम,राबवंणे …
आधुनिक, नवं-स्पर्धांचं आयोजन करणे …
सर्व विद्यार्थ्याच्या,सुप्त-गुणांना पारखणे …
त्यांच्या कलागुणांना,योग्य,प्रोत्साहन देणे …

त्या काळात ” फर्स्ट-क्लासला “…
म्हणजेच साठ-टक्के गुणांना,
खूप मान-सन्मान, मिळायचा …

कौतुकास-पात्र समजून,
आदरानं पाहिलं जायचं …
कारण ,९५ टक्के गुण …
तेव्हा दिले जात नसत …

गणित,सायन्स,संस्कृत या विषयांत,
पैकीच्या- पैकी, गुण मिळू शकायचे …
अन्य विषयांत कापून गुण मिळायचे …

अशा काळात,

आमच्या शाळेच्या,हेड-मास्तरांनी,
विद्यार्थ्याना “मोटिवेट ” करण्याची,
एक अभिनव-शक्कलच, लढवली …

ज्या विद्यार्थ्याला ८० टक्के वा अधिक-गुण,
त्याचं ठळक-नाव शाळेच्या भिंतीवर कायम,

प्रत्येक इयत्तेतील,पहिल्या पाच क्रमांकाच्या,
विद्यार्थ्यात,त्यामुळे चांगलीच चुरस लागलेली …
की, कोण ही अट सर्वांत आधी पूर्ण करतंय … 
ही चुरस मात्र,फारच” हेलदी “स्वरूपाची होती 

” भिंतीवर नाव-लागणे “याचा खरा अर्थ-काय,
  समजण्याचं वय नसलं तरी,ते महत्वाचं आहे,
  एवढं अस्मादिकांना नक्कीच समजत होतं …

  शिवाय वर्ग- शिक्षक व शिक्षिका माझ्यावरच,
  त्यांच्या सगळ्या-आशा होत्या,केंद्रित करून …
  त्यांची मी “फेवरीट”असं सगळ्यांना वाटायचं …

योगा-योग असा की,आईच्या आशीर्वादाने,
त्याच वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, ८६ टक्के,
एकूण गुण,अस्मादिकांना मिळालेही होते …

माझ्या ठळक नावाची, लाकडी- पाटी,
पेंट करून,खूप उत्साहात,बनविली गेली
मुख्य अतिथिंकडून भिंतीवर लावली गेली …
भव्य समारंभ,कौतुकाची भाषणेही झाली …

सर्व शिक्षक वर्ग व माझ्या मैत्रिणींना,
प्रचंड आनंद व अभिमानच वाटला …

थोडी गंमतीची गोष्ट अशी की,
त्यानंतर कैक वर्षे कोणालाही,
त्या भिंतीवर,स्थान मिळालं नाही …

नंतर ती गोष्ट,साफ विसरून गेले …
कॉलेजचे सोनेरी दिवसही संपले …
जॉब,नंतर बिझनेसमधे रंगून गेले …
यथावकाश मग शुभ- लग्न झाले …

विशेष अशी घटना म्हणजे,
शाळा हे मतदान केंद्र होते,
माझे सासरचे- नातेवाईक,
मतदान करण्या,शाळेत गेले …

आल्यावर केवढ्या कोडकौतुकानं,
माझं नाव पाहिल्याचं वर्णन करून,
आल्या-गेल्या प्रत्येकाला होते सांगत …

मनातल्या मनात, मी आमच्या,
हेड-मास्तरांना,ज्यांची ही मूळ
संकल्पना, कोटी प्रणाम केले …

धन्य ते मुख्याध्यापक …
व धन्य-धन्य ते शिक्षक …
ज्यांनी अविरत श्रम करून,
सु-संस्कारांचंच केलं सिंचन …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆









Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!