Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता – 🌷 ‘ भाली प्रकटे त्रिकाल-ज्ञान ‘ तारिख – १६ सप्टेंबर २०१६

कविता 🌷 ‘ भाली प्रकटे “त्रिकाल-ज्ञान” ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १६ सप्टेंबर २०१६

अध्यात्म-विषयीचा खरा अभ्यास …
अंधारातून स्व-प्रकाशाकडे प्रवास …
तामसी-जीवन-जगणं न येई रास,
तर अथक करावाच लागेल प्रयास …

स्तोम नसावं, हवी मनोपासना…
सदा हवी अंतःकरणी सद्भावना …
उजळुनी देह-दीपक केली अर्चना,
लक्ष-दीप उजळती-ईश्वरी-संकल्पना …

देवत्व म्हणजे सात्त्विक दैवी-गुण …
पूर्णतः समर्पित, निराकार निर्गुण
अवतार रूपात करी जगत् कल्याण
भू-वरी सृष्टी-नभी रवी-चंद्र निर्माण …

ज्योत-ज्योत होई हृदयी प्रकाशमान …
जल-स्रोत-स्रोत बने गंगोत्री-समान …
मना-मनात प्रेम-दया-भाव दैदिप्यमान …
भाली प्रकटे तेजस्वी “त्रिकाल-ज्ञान” …

देव न असे बंधनात बांधलेला …
शेता-शेतात बीज-रूपे रुजलेला …
जरी राऊळी पूजन-अर्चन-सोहळा ,
तो सदा हृदयस्थ-गाभाऱ्यात वसलेला …

तेजाला ओवाळीते नयन-ज्योती …
हृदयीच्या-भावार्थाने चक्षू साश्रु होती …
विणा-वादन होता सुस्वर झंकारती …
जणू सप्त-सुर-स्वर्ग धरेवर अवतरती…

जाऊनी भगवन्तासी शरण,
करुनी श्वासांचा झुला पाचारण…
देह रूपी नजराणा चरणी अर्पण …
यज्ञकर्मे फिटे जन्मो-जन्मीचे ऋण …

श्रीहरी भक्ती-भावाचा भुकेला …
सृष्टीच्या कणाकणात सामावलेला …
चराचराच्या अणुरेणुत तो संचारलेला …
दरेक जीवात, अंशतः तो विसावलेला …

नका व्यर्थ शोधू त्याला इथे वा तिथे …
त्याचं अस्तित्व माणसा-माणसामधे …
प्रकटे जड-स्थूल-वा-सूक्ष्म रूपांमधे …
जळी-स्थळी-पाषाणी, दरेक अणूरेणूमधे …

मिटताच दो-बाह्य-नयन,
सहजी अंतःचक्षू उघडून,
सद्-भावे अंतरी डोकावून,
स्वच्छ व सुंदर होतसे दर्शन ……

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷







Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!