Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता – 🌷’ खरं कसब ‘. दिनांक – २ जानेवारी २०२३

कविता – 🌷’ खरं कसब ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
दिनांक – २ जानेवारी २०२३
वेळ – सकाळी ११ वाजून २६ मि.

बघता-बघता सरुन गेलं,
जुनं-पानं मावळतं वर्ष …
नव आशा-आकांक्षांचं,
आलं-आलं हे नूतन वर्ष !

राग, रुसवे-फुगवे सारेच …
गेले घाबरून दूर पळून,
नव्या उमेदीने क्षणन्-क्षण
जगूया आता भरभरून !

कडू-गोड, चुकलं-माकलं …
सगळं-सगळं माफ करून,
नूतन वर्षाला सामोरे जावू,
झालं-गेलं सर्वच विसरून !

सरलेलं ते जुनं वर्ष होतं …
जणू एक जुनंच पुस्तक,
पूर्ण वाचून मनन करून … 
भलतंच गरगरलं मस्तक !

आता आयतं हातात पडलंय,
नवं करकरीत असं हे पुस्तक …
३६५ पानांमधून सुवर्ण लुटून,
मग होऊ आपण नत-मस्तक !

” केल्याने होत आहे रे “
” आधी केलेची पाहिजे “
श्री समर्थांचे हे सार्थ-वचन, 
आचरणात आणले पाहिजे !

आयुष्य कितीही जरी मिळालं,
तरीही सदैव ते तुटपुंजं वाटतं …
“उद्याला करु” असं म्हणंत-म्हणंत,
अवघं आयुष्य सरून जाऊ शकतं !

“कल करे सो आज कर”, 
” आज करे सो अब ! “
जगूया अर्थपूर्ण-सुंदर-जीवन, 
त्यातच दडलं आहे खरं कसब !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

















Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!