Welcome to my poetry blog

I use this space to catalog the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता – 🌷 ” अनमोल ग्रंथराज ” तारिख – सोमवार १९ फेब्रुवारी २०२४

कविता – 🌷 ” अनमोल ग्रंथराज “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – सोमवार १९ फेब्रुवारी २०२४
वेळ – दुपारी, ४ वाजून ४१ मि.

शिवथरघळीला निबीड वनामध्ये, माघ शुद्ध नवमीला …
१७ व्या शतकात, श्रीसमर्थांनी दासबोध ग्रंथ लिहीला …

मानवी-जीवनाविषयी त्यांचा सखोल-परिपूर्ण अभ्यास
ज्ञानी-सशक्त-समाज घडविणे-हाच होता एकमेव ध्यास …

रामदास स्वामींनी केली भक्तिमार्गाने-शक्तिची उपासना 
त्यांचा ठाम विश्वास, उपासनेतून सामर्थ्याची जोपासना …

त्यांनी-संपूर्ण देशभरात कैक-ठिकाणी केले मठ-स्थापन …
मारुतीरायाच्या-शक्ति-उपासनेतून जन-मानसाचं संघटन …

आजही कालातीत अशी ‘समर्थ-शिकवण’, तंतोतंत लागू …
उमगते वैयक्तिक-सामाजिक-प्रश्नांवर कसा ठेवावा काबू …

या ग्रंथात नानाविध गोष्टींचा समावेश व मुद्देसूद उहापोह …
स्वास्थ्यपूर्णतेस जरुरी, नष्ट करणे-काम-क्रोध-लोभ-मोह …

मोजक्याच-शब्दात व्यक्त केला सडेतोड-अचूक युक्तिवाद …
ना शब्दांचं अवडंबर-ना वितंडवाद,त्यात निव्वळ बुद्धिवाद …

आरोग्याचा कानमंत्र लहान-थोर, स्त्री-पुरुष, सर्व सुजाण …
मानवी मनास-ज्ञानेंद्रियांना उपयुक्त-हे उपदेशपर लिखाण …

सांगड घालते-ज्ञान-परमार्थ-धर्मनिष्ठा-देशप्रेम-भक्तिमार्ग,
मानसिक आरोग्य-शरीर स्वास्थ्याचा, हा एकमेव राजमार्ग …

ज्ञानाचा-प्रसार, मनावर ताबा, नेटक्या संसाराचं मार्गदर्शन …
आयुष्यास सुंदर व योग्य वळण कसे लावावे, याचं विवरण …

शरीर-स्वास्थ्य-दैनंदिन जीवनातील नानाविध पैलूंना स्पर्श,
तत्कालीन बहुतांश अध्यात्मिक-वाङमयाचा, जणू सारांश …

हा अनमोल ग्रंथराज नाही नुसता वाचण्या-पारायणसाठी,
जरुरीचं आहे शब्दांचं चिंतन-मनन, प्रत्यक्ष आचरणासाठी …

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆




































Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!