I use this space to catalog the poems written by me.
Hope you enjoy them.
About Me
I am Tilottama Lele a poetry enthusiast.
By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.
Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.
Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.
कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र शिव-पार्वती विवाह म्हणून 'महा-शिवरात्र' पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक, बिल्वपत्र झळकतो वैश्विक उर्जेचा प्रचंड स्रोत सर्वत्र
अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला, थेट स्वर्गातून पृथ्वीवरती आणले गंगेला शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला, म्हणून 'गंगाधर' नावानं ओळखला गेला
अमृत-मंथनात चौदावं रत्न, हे जहरी विष निघालं भोळ्या शंकरानं ते 'हलाहल’ प्राशन करुन टाकलं सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं तेव्हापासूनच 'नीलकंठ' हे नावही त्याला मिळालं
शिव-तांडव नृत्य, जगात आहे सुप्रसिध्द निसर्गही हवं ते देतो, भरभरुन मुक्तहस्त कधी कोपला तर मात्र, होऊन तो क्रुद्ध थैमान घालून तांडव-नर्तन करतो, संत्रस्त
शिव-शंकर-भोलेनाथ, हे-निसर्गाचं-जणू-प्रतिकात्मक-रूप- खास सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनी सृष्टीचा विनाश त्रिलोचन-शिव तिसरा डोळा उघडून तांडव करतो विनासायास एक निसर्गाचं 'रौद्र रूप',दुसरें'रूद्र-निर्मित'भयंकर सर्वनाश
कैक पवित्र शिवालयं अत्यंत दुर्गम भागात उभी राहिली अमरनाथ, केदारनाथादि तीर्थक्षेत्रं पर्वत-कुशीत वसली भीमाशंकर, तुंगारेश्वर आदि घनदाट अरण्यात विसावली निसर्ग-संरक्षणामुळे मानवी-अस्तित्वाची पताका टिकली
'सत्यम् शिवम् सुंदरम्' हे विशेष प्रतिक आहे निसर्गाचे त्रिनेत्र, भालचंद्र, गंगाधर, नीलकंठ, रुद्रादि नाव तयाचे ! पशू-पक्षी, वृक्ष-वल्ली, वनराई, नद्या, झरे, अवघी सृष्टी संवेदनशिल मनात चौफेर पडेल, प्रतिबिंब शिवाचे दृष्टी !
हर पूनम की मुरादों-वाली हसीन सी रात, लगतीं है जैसे चमचमाते तारों की बरसात, चांदका जादूभरा जाल हसीं है लम्हा-लम्हा, या फ़िर चाॅंदनी में, यूं पिघलता हुआ आस्मां…
People will always have something to say, But we’ll live with our own choices, Whatever we do, something they’ll say Let’s do our best n achieve success…
Der’s magical healing under d shade, Lying back n dry leaves drop on d head, Colourful Nature is very comforting, We walk n experience d power of healing
भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस
सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी
दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत
You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.