ब-याच वेळा एखाद-दुसरी साधीशी घटनाच घडते ... तद्-नंतर मात्र ती खूप दूरवर खोल परिणाम करते ... पण आपल्याला लगोलग काहीच आकलन न होते ...
ब-याच उशीराने, विचारान्ती हलकीशी जाणीव होते... आयुष्य पाहिलं तर, निव्वळ अपघाती घटनाच आहे... हा अपघातही विधात्याच्या योजनेचा एक भाग आहे...
हे लक्षात यायला बराचसा कालावधी लागतो मुळात... पूर्व-नियोजित गोष्टी, कधीही "नियोजित" न भासतात... सकृत-दर्शनी न वाटल्या तरी, पूर्व-नियोजितच असतात...
आपल्या समोर नेहमी तीन-ते-चार-पर्याय असतात, आपण सखोल विचार-मंथन करून मग त्यातलाच, निवडतो कधीकधी एखादा मार्ग स्वयंस्फूर्त-रित्याच...
वास्तविक पाहता, आपण कधीही नसतोच " कर्ता " नेहमीच " प्रि-प्रोग्रॅम्डं "असण्याची घनदाट शक्यता... कदाचित असावा हा एक विडीओ-गेम-विधात्याचा...
त्यातील एखादी नगण्य व्यक्ती, ही आपली भूमिका त्याच्या विरंगुळ्याचा एक-अब्जांश, क्षुल्लक हिस्सा जरी " गेम " जिंकण्याचीच प्रत्येकात असते क्षमता...
पायाभूत कुवत अंगी असूनही, किती " श्वास टिकेल... यशस्वी होऊन कोणत्या" पायरी-पर्यंत जाऊ शकेल ... हे त्याच्या अंतर्गत-सूक्ष्म जाणीवांवर अवलंबून असेल ...
ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळातील प्रत्येक प्याद्यात, स्वतः "वजीर"होण्याची पात्रता असते सुप्त स्वरूपात, बहुतांश प्यादी अयशस्वीच वजीर-पद प्राप्त करण्यात
अनेक गोष्टींवर अवलंबून त्याचं वजीर होणं-न-होणं... त्याचप्रमाणे प्रत्येक माणसात सुप्त-शक्ति आणि-गुण... जे अत्यावश्यक असतात दैवत्वा-पर्यंत-पोहोचण्यास
पण माणसाला जन्मजात भोवणारे "शड्-रिपू" नडतात त्याचं चित्त विचलित करून त्यास एक-प्यादं बनवतात आयुष्यभर एकेक घर, पुढे-मागे करणेच भाग पाडतात
Leave a Reply