कविता :🌷”मिटल्या नयनीं”

कविता : 🌷 " मिटल्या नयनीं "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

स्वप्न प्रितीचे राधिका पाहते मनी,
भर दिवसा, मिटल्या दो नयनांनी...

मूर्तिमंत छबीच जणू ती साकारली...
जरी प्रेमापोटी पुरती झाली आंधळी...

ती मूर्ती अति देखणी गोजिरवाणी
उमलली पाकळी-न्-पाकळी झणी...

तो निशिगंध नसानसात भिनलेली,
ती रात्र पूनवेची उजळूनी न्हालेली...

सागराला जस-जशी येतसे भरती,
लाटांवर लाटा बेभान होऊन जाती...

स्वप्नांची रंगतही सप्तरंगात बहरली,
भर चांदण्यात अलगद प्रीत झंकारली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!