कविता:🌷”आराधना चंद्रघंटेची”


कविता : 🌷 " आराधना चंद्रघंटेची "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

शिव-पार्वती शुभ-विवाह सोहळा संपन्न होता ...
गौरीने भाळी धारण केली, अर्धचंद्राकृती घंटा ...
त्याघंटेमुळे तदनंतर देवीचे नाव पडले चंद्रघंटा ...
तिसऱ्या दिवशीची शुभ-माळ, चंद्रघंटे करीता ...

शस्त्रं-अस्रांनी सुसज्ज, दश-भुजा त्रिनेत्रा देवी ...
त्रिशूल, गदा, धनुष्य, खड्ग, एकेका करी ठेवी ...
कमल-पुष्प तथा कमंडलू धरिले एकेका हाती ...
एक हात उंच वर-देण्या, तलवार उजव्या हाती ...

दानवांचा निःपात करण्यास, देवी तयार ...
कौशिकीच्या स्वरुपात दुर्गा झाली स्वार ...
व्याघ्रारूढ देवी, फेके डोळ्यातूनी अंगार ...
शुंभ-व-निशुंभाचा विनाश केला अपरंपार ...

कोपलेल्या चंद्रघंटेचे वाहन, व्याघ्र ...
रणचंडिकेचे भीषण रूप घेतले उग्र ...
रणी खच दानवांचा, देवी राही अग्र ...
धुम्रलोचन-वध, पराभूत दैत्य समग्र ...

चंद्रघंटा देवीचे करता पूजन-अर्चन ...
शुभ-आशिर्वादे पापांचे होई क्षालन ...
सर्व बाधा नष्ट, कार्य होती निर्विघ्न ...
होते कष्टांचे निवारण, भक्तांचे-रक्षण ...

वांच्छित लाभासाठी, देवीची आराधना ...
होईल प्रगती कृपेने-अध्यात्मिक-साधना ...
यथाशक्ती अर्पण करूनी, तन-मन-धना ...
माता चंद्रघंटा हरण करी साऱ्या विवंचना ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!