दुसऱ्या जन्मी, ती जगन्माता… वर्शानुवर्षे घोर तपस्या करता… तिन्ही लोकी कुतुहुल पसरता… कोण असेल बरं ही तपस्विता…
पहिल्या वर्षी फक्त फलाहार ग्रहण… दुसऱ्या वर्षी, फक्त बिल्व-वृक्ष-पर्ण… तदनंतरची कित्येक वर्षे शुष्क-पर्ण… मग तिने अजून तीव्रतेने केला"प्रण"
"जोवर स्वतः शिव-शंकर देतील दर्शन, वर्ज्य सर्वच, फळे-पर्ण-पाणी वा अन्न !" देवाधिदेव-महादेव स्वयं समाधित मग्नं… तिन्ही लोक भयभीत, त्यात येईल विघ्नं…
शिव-शंभों जर का कोपले तर काय होईल या विचारांनी अवघी धरती थरथर कापेल… देव आणि दानव घाबरून पळतच सुटतील त्रिनेत्राने डोळा उघडता, भस्मिभूत होतील…
ब्रह्म-तपात लीन होती त्रिभुवन-सुंदरी,… त्रिकालज्ञानी धरली, रुद्राक्ष-माळ करी… कमंडलू धरले असे, तिने दुसऱ्या करी… श्वेत-वस्त्र-परिधान केलेली ही माहेश्वरी…
गौर-वर्णी शोभती, धवल-वस्त्रं… शांतीदायिनी, तपश्चर्या हे अस्त्रं… तप-साधनेत रत, न हाती शस्त्रं… ज्योतीर्मय अंतर्तेज पसरे चतुरस्त्रं…
शोभून दिसे देवी पुष्प-अलंकारांनी... "ब्रह्म-चारिणी" नाम, धारण करूनी... सात्विक आहार पवित्र रूपधारिणी, त्रिलोकी तिज "अपर्णा"म्हणे कोणी...
देवी ब्रह्म-चारिणीची दिव्य-दिप्ती… तिच्या दर्शने, लाभे-अंतस्थ-शांती… तिला मनोभावे पूजता, देई तृप्ती… देवी कृपा होता, विजयाची-प्राप्ती…
Leave a Reply