🌷वास्तव्य-बाप्पांचे... कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
सण म्हणजे प्रत्येक मना-मनातील आनंदोत्सव... त्याकरिता कधीही न होऊ दे निसर्गाला ऊपद्रव... म्हणून समस्त भक्तजनांना कोटी-कोटी आर्जव… उधळपट्टी-दिखाव्याला न द्यावे महत्त्व अवास्तव
भक्त करती धावा," हे देवा, आम्हां पाव रे पाव ". कुणीही ना विचारी,"बाप्पा, तुम्हां काय हवं राव " आता बाप्पाच करताहेत विनवणी, भक्तजनांना... "लक्ष द्या, छाटून टाका साऱ्या वायफळ गोष्टींना"...
टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सुरु केली होती प्रथा... पाहून सद्य-भ्रष्ट-स्वरूप लाज वाटेल त्यांना आता... आप्त-स्वकीय-मित्रांसमवेत करूया "मानस-पूजा"... विसरून अनावश्यक असा फुकटचाच गाजावाजा...
“नैसर्गिक गोष्टीच प्रिय-मजला, बेत असावा साधा”... साजरा व्हावा सण असा चाखूया त्यातील खरी मजा... खोट्याचा लवलेश नको, कृत्रिम-गोष्टींची मज बाधा... नको तो बडेजाव, साधेपणातूनच अनुभवू “और मजा”..
छोटिशी अशी बाळ-स्वरूप-मूर्ती स्वत: हाताने बनवा... तिलाच शेंदूर, हळद फासून, हिरवागार पाला लावा... नैवेद्यासाठी दूध, दही, गूळ-खोबरे अथवा सुका-मेवा... प्रसन्न होईल तेव्हा माझ्यासकट संपूर्ण-निसर्ग-देवता...
पूर्णपणे विसरून भक्तजनहो, पूर्वी जे-जे करत आले... आजपासून निसर्ग-दत्त गोष्टींनीच, माझे पूजन करावे... जिथे दोन हस्त-एक मस्तक असे भक्तिभावे झुकलेले, त्या ठिकाणी माझे वास्तव्य असे शंभर टक्के ठरलेले...
Leave a Reply