महागौरी-दुर्गा देवीचा आज अष्टम-अवतार!
करुया देवीच्या, कुमारी स्वरुपाचा जयकार!
कविता – 🌷 “महागौरीचं कुमारी स्वरूप”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख- ८ ऑक्टोबर २०१६
आजची आहे आठवी ही माला-शोभून दिसते “महागौरीच्या” गळा …
दुर्गेनंच हा अष्टम-अवतार घेतला, सुंदर कोवळी आठ वर्षांची बाला!
अत्यंत शुद्ध व पवित्र वीर-बाला …तपामुळेच गौर वर्ण होता लपला …
गंगास्नान करून मूळ गौर-कांती …तेजस्वी बिजली-परि चमचमे ती!
महागौरीचा सर्वात प्रिय रंग श्वेत …अलंकार श्वेत, वस्त्रं श्वेत,वर्ण श्वेत …
म्हणून नाव “श्वेतांबरधरा” पडलं,
देवीचा गौरवर्ण चंद्रासमान, शंखासमान-कोमल,नाजूकशी शुभ्र-कुंदकळ्यासमान
महागौरी नाम दर्शवी स्वच्छ गौर-वर्ण- नंदीवर आरूढ, दैदिप्यामान जणू सुवर्ण
अलौकिक ज्ञान व अनुभूती ध्यानामुळे, श्रद्धा, विश्वास, निष्ठाभाव वाढे त्यामुळे
देवी दाखवी योग्य दिशा, मार्ग ज्यामुळे, जीवनाची वाट-चाल सुकर, तृप्ती मिळे!
चतुर्भुजा-त्रिनेत्रा, बुद्धिमान-शांत देवी उजव्या हाती त्रिशूल,अभय-मुद्रा दावी
शोभे वरद-हस्त अन् डमरू डाव्या हाती -वृषभ असे वाहन,आरूढ त्यावर होई ती
भारतीय परंपरा, पूजा कुमारीची …पूजा, देवीच्या कुमारी-स्वरूपाची!
देवीला संगीत, वाद्य-गायन-बाजा-राही अपूर्ण त्याशिवाय तिची पूजा!
भक्तांचं करी रक्षण,करी दुरा-भाव नष्ट-कितीही आली, क्लेश,संकटे दुःखं,कष्ट
नाश करण्यास व्याधी, रोग वा दुष्टं, धावून येते हाकेला, संपवीते अरिष्टं …
सिद्धी-दात्री अधिष्ठात्री देवी! पापांचा सर्वनाशच करणारी …
असुरी-शक्ति-विनाशकारी …विश्वाला मुक्ती देणारी देवी …
नंद पर्वतावर राहणारी, हिमालयपुत्री
प्रसन्न होऊन देई, अमोघ शक्ति-दात्री!
भक्ताच्या ज्ञानात भर घालणारी देवी …
एकूण अठरा सिद्धिंची वरदाती देवी!
अन्नपूर्णेचं रूप स्वतः धारण करते!
भक्तांना आतुन स्थिर-प्रसन्न करते …
चांगल्या-वाईटाचा समतोल राखते!
आत्म्याला शुद्ध-पवित्र-शांत करते …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏
Leave a Reply