कविता : 🌷 " तो आणि ती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
शाळकरी होता तेंव्हा सुध्दा त्याला ती आवडायची...
मित्राची बहिण असल्याने सहजच दृष्टीस पडायची...
ती हुशार, लांब-लचक केस, गालावरच्या खळ्यांनी,
पाऊल टाकता क्षणी जणूकाही मनं जिंकून घ्यायची...
सदैव जणूकाही स्वतःच्या विश्वात रममाण असायची
एखाद्या कटाक्षा इतपतच, ती कोणाला भाव द्यायची...
घर ते कॉलेजच्या मार्गात कुणीतरी तिला अडवायचा
बाईकने तिच्या अवतीभवती, रोज घिरट्या घालायचा..
योगायोगानेच मित्राने ती गोष्ट त्याला सांगितली होती
त्याने परस्पर भेटून, ताबडतोबच कामगिरी फत्ते केली
यामुळेच कदाचित तिने त्याची थोडीतरी दखल घेतली
ओझरतीच का होईना नजरा-नजरही व्हायला लागली
तिच्या नजरेत नव्यानेच किंचित आपुलकी जाणवली
तिच्याशी बोलण्यासाठीच, मित्रा-घरी हजेरी असायची.
शेवटी एके दिवशी होती-नव्हती ती हिम्मत गोळा केली
तिच्या घरी जाऊन, त्याने तिला चक्क मागणी घातली
अनपेक्षितपणे घटना घडली अन् ती नकळतच लाजली
जन्म-जन्मांची वाटचाल जणू त्याक्षणीच पक्की झाली
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply