कविता : 🌷 " विसरून वेदनेस "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
विसरून वेदनेस अंतरी खोटेच हासतो मी...
कधी एकांतात, नखशिखांत रडून घेतो मी...
नितांत प्रेम करूनही अ-व्यक्तच राहतो मी...
अखंड बरसूनही अपूर्णच उरला असतो मी...
किती जवळ असूनही, किती योजने दूर मी...
“नेमके काय बिनसले,”भंडावलो या प्रश्नानी...
यथोचित सगळे असूनही मिथ्याच हा हव्यास...
का क्षुल्लक गोष्टींवरून हा फुकाचा विपर्यास ?
स्वर्ग-सुखाची बरसात, प्रत्यक्षात की स्वप्नात...
दृष्ट लागली कुणाची की हा सगळा आभास...?
कधी कधी प्रश्नांवर प्रश्न मनांतरी, रेंगाळतात...
अन् गुलदस्त्यातून उत्तरे, खदा-खदा हसतात...
🌷 तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply