
कविता 🌷 " ही अजब लीला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
भल्या पहाटे, पहाटेला...
दंव बिंदूनी खेळ मांडला...
पानो-पानी चमचमणारा,
दंव बिंदूचा सडाच पडला...
काठोकाठ प्राजक्त फुलला,
सत्यभामेस अति हर्ष झाला...
दंव बिंदूंचाच खेळ चालला...
सडा फुलांचा पडला ओला...
दारीचा पारिजात वेचताना,
रुक्मिणीचा हर्ष गगनी मावेना...
ते पाहता पाहता, गंगा यमुना...
भामेच्या नेत्रांत गोळा झाल्या...
"जरी पारिजात दारी माझिया,"
"फुलांचा सडा, तिला मिळाला"...
नियतीचा डाव हा उजवा-डावा,
कि श्रीकृष्णाची ही अजब लीला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply