कविता – परिभाषा-निरपेक्ष-भक्तिची


कविता - परिभाषा-निरपेक्ष-भक्तिची
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

आज शुक्ल-पक्ष, चैत्र-मास-पौर्णिमा-तिथी...
शुभ-घडी, चित्रा नक्षत्री, श्री हनुमान-जयंती...

येता जुळून अमृत-योग जन्मला योग-केसरी
मंगल-दिनी ही मंगल-घटिका होतसे साजरी

जणू प्रत्यक्षात हनुमान जन्म-दिवशीचा योग
यंदाचे वर्षी-तिथी ग्रहमान-योग, नेमका तोच

एकशेवीस वर्षांनी पुनः जुळून आले संजोग...
हनुमान-जन्मसमयीचा हा जणू सुवर्ण-योग...

अंजनीचा सुपुत्र म्हणून नाव पडले, अंजनेय...
पवन म्हणजेच वायुचा पुत्र, म्हणून "वायुपुत्र"...

कपि-कुळामध्ये झाला, जयाचा पावन जन्म...
म्हणूनी त्या नव-बालकाचे नाव ठेवले हनुमंत...

अष्टौ-सिद्धि व नव-निधींचा, श्री हनुमान दाता...
शक्ति-बुद्धि, सेवा-भाव, त्याग, भक्तिचा त्राता...

शेंदूर चर्चित, गदा-धारी हा रामाचा परम-भक्त,
जे-जे श्रीरामभक्त त्या-सर्वांवर हनुमंत आसक्त ...

नित्य करीत असे, कृपेचा वर्षाव सद् भक्तांवरी...
रंक असो किंवा राव, भेद-भाव कधीही न करी...

आजच्या दिवशी, भल्या पहाटेच स्नाना-पश्चात,
शेंदूर-चमेलीतेल-चांदीच्या-वर्खाने पूजा साक्षात...

निरहंकारी अन् परोपकारी, दिव्य-ऊर्जा-शक्तिची
प्रभूरामचंद्र-भक्त हनुमान हेचि-परिसीमा-त्यागाची...

कसोटीच्या क्षणी, सर्वांच्या समक्षच छाती छेदून,
हृदयी वसलेल्या श्री राम-सीतेचं दाखविलं दर्शन !

परिभाषा-निरपेक्ष-भक्तिची व अत्युच्च कोटीची...
प्रभूरामचंद्रभक्त हनुमान म्हणजेच स्वामी-भक्ति...

बोलो सीयावर रामचंद्र की जय ।।
पवनपुत्र श्री हनुमानजीकी जय ।।

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!