कविता - 🌷 " चिंब संध्याकाळी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
गर्द-नभांतरी पडला वेढा सावळ्या-घनांचा
तोही निसर्ग-वेडा घनदाट घन-घन-नादांचा
इंद्रधनुचा, जीव-वेडावला सप्तरंग-छटांचा
सरींवर-सरी झेलताना ओल्या-ओंजळींचा
बेधुंद मनातील ओलावा सुगंधित मातीचा
मऊ-मखमली हिरवागार-हिरवळ-गालीचा
ओलेत्या चिंब चिॅब-झालेल्या संध्याकाळी
दूर दूर क्षितिजा पलीकडे, होती खोळंबली
वा-या-संगे गाणी-गात झुळुक सुखद आली
सायंकाळी ऐन तिन्ही-सांजेच्या कातरवेळी
नजर पडता मावळतीच्या वाटेवरती सोनेरी
वसुंधरेला भेटावया पावसाने लावली हजेरी
रात्रीच्या चाहूलीने चिंब चिंब होऊन भिजली
संधी-प्रकाशित तप्त-धरा तृप्त-सुगंधित-झाली
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply