कविता - 🌷 " वर्षा ऋतू " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
प्रत्येक ऋतूचं स्वतःचं असं खास व्यक्तिमत्व, त्यामुळेच पृथ्वीवर वाढत असतं त्याचं महत्व प्रत्येकाला स्वतःचा असा स्वतंत्र चेहरा-मोहरा, म्हणून हवाहवासा वाटतो त्यांचा वार्षिक-दौरा ...
वर्षा ऋतू म्हणजे "नेमेची" येणारा पावसाळा, आठवते चिंब भिजलेली, अवखळ" मधुबाला " ... मनात गुणगुणायला लागते, अनोखी गीतमाला ... मनात "इक लडकी भीगीभागिसी," वाजायला ...
पाऊस म्हटला की आठवतं ते भाबडं बालपण ... चुरशीने मिळेल त्या कागदाच्या होड्या बनवणं ... कुठेही साचलेल्या वाहत्या पाण्यात त्या सोडणं ... पाणी शिरून बुडेपर्यंत, त्यांनाच एकटक पाहणं ...
पावसात भिजत-भिजत 'झिम पोरी झिम'गाणं ... डोकं ओलं झाल्यावर घाबरुन, आईकडे बघणं ... नंतर शिंका आल्या की घरच्यांचा ओरडा खाणं ... आईच्या उबदारशा-कुशीत, लटकेच-हुंदके-देणं ...
Leave a Reply