कविता 🌷’ माणूस नामक गूढ बेट ‘

कविता :🌷’ माणूस-नामक-गूढ-बेट ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ५ जुलै २०२३
वेळ : दुपारी, ४ वाजून ५० मि.

घोडेस्वार घोड्याला पाणवठ्यावर सोडतो,
तहान असेल तर घोडा पोटभर पाणी पितो
अन्यथा घोडा जागेवरुन हलत सुध्दा नाही !
कोणी जबरदस्तीने पाणी पाजू शकत नाही !

अंतस्थ-गुरुची तोंड-ओळख सद्गुरु करतात
शिष्यास ते जाणून घ्यायची ओढ असल्यास,
त्या-पथावर अध्यात्मिक प्रगती करु शकतो,
किंवा संसार-रुपी-चक्रात गटांगळ्या खातो !

पाणी किती पितो, घोड्याची तहानच ठरवते
गुरु-निर्देर्शित सन्मार्गी-वाटचाल, तहान करते
गुरु-हे-माध्यम,’अंतस्थ-महागुरु’चे-भान देते !
तम वितळून, अंत:करण स्वयं-प्रकाशित होते 

अंतस्थ-गुरु-भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट 
आजवर मनात दडलेल्या प्रश्नांची, उत्तरं थेट !
जन्म-मृत्युच्या-कचाट्यात-जणू-कमळाचे देठ 
लख्खं-सूर्य-प्रकाशी, माणूस-नामक-गूढ-बेट !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!