कविता 🌷 ‘ कवयित्रीच्या नजरेतून ‘


कविता – ,🌷 ” कवयित्रीच्या नजरेतून “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १ जानेवारी २०१७
वेळ – दुपारी २ वाजता 

“दशाननाला दहा शिर, वीस हात व वीस पाय “
या वर्णनाचा मतितार्थ भिन्न भिन्न रूपानं 
दहा-डोकी असलेला, दसपट बुद्धिमान 
वीस हात-पाय म्हणजे, दसपट बलवान 
एकटा रावण ताकदीनं, दहांच्या समान !

फुलांच्या ऐवजी, रावणाने महादेव-आराधनेत,
स्वतःचं एकेक शीर-कमल शंभोस अर्पण केलं …
त्याच्या,याकृतीचा प्रतिकात्मक स्वरूपाचा अर्थ,

विद्वान-पांडित्य व बुद्धी-चातुर्यामुळं, रावणानं,
मनं, बुद्धी, मानस, चित्त, अहंकार व अंत:करण,
या दश मनोदशांचा-वृत्तींचा केला-त्याग संपूर्ण
अपेक्षे-प्रमाणे प्रकटले, देवाधिदेव होऊन प्रसन्न !

महर्षी वेद-व्यास यांच्या प्राचीन ‘रामायण’ 
या महा-काव्याचा खलनायक, हा रावण …

जितका रावण अहंकारी, त्या विरुद्ध
सुशांत विनयशील राजकुमार श्रीराम 
एकवचनी, एक-पत्नी, आज्ञा-धारक,
सर्वांना आपलंसं करणारा, प्रभूश्रीराम 
पालनकर्ता पुत्रधर्म-पतिधर्म-राजधर्माचा 
सुशीलमहा-पराक्रमी सुपुत्र कौसल्येचा 

रावणाने ज्यांना अत्यंत-तुच्छ लेखून,
पूर्ण वगळलं ब्रह्माच्या अभय-दानातून,
ते म्हणजे मनुष्य व वानर, ज्यांच्याहातून,
कधी काळी त्याचा मृत्यू होण्याचा संभव !

रावणाने सोन्याची बनवून लंका …
श्रेष्ठतम बुद्धीजीवींना,आश्रय दिला …
त्यानं अधीन करुन ठेवलं, नवंग्रहांना
जणू काळावरही मायावी-जय मिळवला …

रावणाच्या अधिपत्या-खाली,
दानव-मंडळी फारच माजली …

त्यामुळे त्याच्या राज्यात दानवी-राक्षसी,
दुष्ट प्रवृत्तींच्या थैमानानं केलं त्राही-त्राही
दुष्ट प्रवृत्तींनी बहकुन केलं होतं त्राही-त्राही
तिन्ही लोकी प्रचंडं दहशत निर्माण झाली ..
त्रिलोकात प्रचंडं दहशत निर्माण झाली …

त्या सगळ्यांवरही कहर म्हणून,
रावणाने सीतेला,पळवून नेऊन,
आयुष्याचं,अंतिम दुष्कृत्य केलं …

कार्यारंभी, रामाने पूजा केली रामेश्वराच्या सागराच्या तटी, 
स्थापना-वाळूच्या लिंगाची-आद्यशिव-शंभूची अर्चना केली, 

जांबुवंताच्या आदेशानुसार, नल-नील भावा-भावांनी,
वानर- सेना गोळा केली-मनोमन”जय श्रीराम”म्हणत,
एकेक शिला जळी टाकून, बांधला समुद्र-पूल, लंकेपर्यंत

त्यावरुन लीलया समुद्र लांघून, रामाने सेनेसह लंकेत डेरा टाकला 
एक मनुष्य, वानर-सेनेसह समुद्र लांघून, लंकेला येईल लढायला 

हे रावणाच्या ध्यानीमनीही नव्हतं- त्याचं मनोधैर्य पार खच्ची झालं !
पोटात भीतिचा गोळा येऊन-आत्म-विश्वास साफ डळमळीत झाला

लंका हे बेट आहे, चारी बाजूंनी पाणी,
त्यावरून हल्ला करू न शकत कोणी …
हा भ्रमाचा-भोपळा पूर्ण-फुटला आणि,
त्याच्या तोंडचं खरोखरचं,पळालं पाणी !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!