कविता – 🌷 ‘ ताबा कुणाचा दैवावर ‘

कविता - 🌷 ' ताबा कुणाचा दैवावर '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार ६ डिसेंबर २०२३

फार कमी वेळा असं वाटतं तृप्त...
असमाधान, अतृप्त भावनाच लुप्त...
मनीच्या सर्व-आशा-आकांक्षा, सुप्त...
अंतरामधील सल-रुसवे-फुगवे गुप्त...

अंतरीचं समाधान आहे एक भावना
जिला जपून ठेवणे, ही एक साधना
हे शक्य मन-स्वच्छ-निकोप असताना
भरभरूनचं जगणं किल्मिश नसताना

आयुष्य, असतं मोजक्याच श्वासांवर
म्हणून काणाडोळाच करून दोषांवर
प्रेम द्यावे अन् प्रेमच वेचावे वरचेवर
असतो का ताबा कुणाचाही दैवावर ?
 
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!