कविता : 🌷” एक आदर्श “


कविता : 🌷” एक आदर्श “
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

वयातील फरकामुळे वडील-बंधू असूनही
सगळे मोठे-भाऊ, मला जणू पितृ-स्थानी

तिसरा क्रमांक आहे सर्व-भावंडात-“सु”चा  
अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील स्वभावाचा

लहानपणापासून तो खूप सोशिक-कष्टाळू
विनम्र, कर्तव्यनिष्ठ अन् कमालीचा दयाळू

बालपणी आमटी हा-‘सु’चा जीव की प्राण
आमटी नसली की, तो सोडी जेवण-खाण

एरवी तो शांत-समजूतदार-समाधानी, असे
आजारपणात उगीचची, चीडचीड होत असे

‘सु’ने हट्ट धरला, मुळा घातलेल्या आमटीचा
आईने जादूने झटक्यात-हट्ट पुरविला त्याचा

आश्चर्यजनक स्मरण-शक्तीचा अद्भुतसा ठेवा
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून स्मृतींचा ताटवा

विपरीत परिस्थितीतही कसून अभ्यास केला
आईच्या-शुभाशिर्वादांनी तो इंजिनिअर झाला

चांगली यशश्री मिळवून नेत्र-दीपक कामगिरी 
आई-दादाच्या-परिश्रमांची पूर्ण पूर्तताही केली

दादा-सम सर्व भावंडांच्या शिक्षणास हातभार
यामुळे आई-काका-सर्वांना, केले आनंदी फार

मी-व-लामू आम्हांवर पुत्रवत्-माया-सदा-केली
मुलांनाही चुकून आमच्या नावानेच हाक मारी

अगदी शेवट-पर्यंत, आईची सेवा-सुश्रुषा केली
तिला सुखी ठेवून, तिची-सुरेख जपणूक केली

गरजवंताला मदतीचा हात देण्यास तो धावतो
अर्ध्या रात्रीमध्ये न बोलावताही तो हजर होतो

त्याची शारिरीक अन् मानसिक-क्षमता-पाहून,
भले-भले-तरुणही मान-खाली-घालती शरमून

त्याची दोन्ही पिल्लं, आपापल्या घरी रममाण
त्यांच्या-स्थितीची-अडचणींची तो ठेवतो-जाण

दु:खी नाही, एकटा मस्त आयुष्य जगतो आहे
अनेकानेक-आई-बापांसाठी तोच आदर्श आहे

अध्यात्मिक-ज्ञानगोडी, त्यातील-निर्मळ-आनंद
आईचं-बाळकडू-आहे अध्यात्माचा-त्याला-छंद

माझा-सु-अण्णा, वाटतो त्याचा-सार्थ-अभिमान
जपतो सर्वांनाच रंक असो वा राव, थोर वा सान

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!