कविता – 🌷 ‘ समर्पण ‘ तारिख – १६ सप्टेंबर २०१६

कविता – 🌷 ‘ समर्पण ‘           
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १६ सप्टेंबर २०१६

कविवर्य कुसुमाग्रज असती महान
लेखन-सामर्थ्ये होई रसिकांस ज्ञान 
देवाचं वास्तव्य हा विषय नसे लहान …
विचार-लहरींचं सुरु होतं गूढ-थैमान ..

मनुजानं बांधली देवळे अनेकानेक …
कला-कुसरीला लागली वर्षे अनेक ...
गाभाऱ्यात किमती-माणके कित्येक 
वास्तु उभारण्या करामती अठराशे एक …

सर्व जमूनही देव काही केल्या मिळेना,
जंगजंग पछाडले, पावा काही वाजेना …
उत्सव-मूर्तीविना मंदिर काही खुलेना …
माणसांचा नवस-धावा तो काही ऐकेना …

भाव असेल सच्चा, तरच पावतो देव …
भावात नाही ” राम “, तरी देवा मला पाव …
जिथे श्रेष्ठ गुणांचं दर्शन, तेथेच होतसे नमन-पूजन
मस्तक झुके, दो-कर जोडून, ईश्वरी भाव तो अति-पावन …
सहज पावतो तो, भक्तांची आंतरिक कृतज्ञता जाणून …

समर्पणावीण मानव बनू शकतो दानव,
देव-देवतांच्यात सुद्धा करतो भेदभाव…
अवघ्या विश्वात केवळ “भक्ति-हाच-खरा-भाव “
एकच शक्ति तरी जगभर दिली जाती हजारो-नावं …

जेथे जेथे होतसे खरेे श्रम-दान …
तेथे नक्की असते ” श्रीं ” चे स्थान …
मनःपूर्वक घेईल जर हरी-नाम …
तेथे अवश्य प्रकटे तो गुण-निधान …

जो कुणी जातो पूर्णत्वाने त्यास शरण …
अंतर्यामी करुनी तन-मन-धन-अर्पण …
समूळ नष्ट करूनी अंतरीचे ” तम “,
सहजी साक्षात्कार देई तो निर्मम …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!