कविता - 🌷 ' अविस्मरणीय अनुभूती '
कविता - 🌷 ' अविस्मरणीय अनुभूती '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
वेळ - दुपारी १२ वाजून २० मि.
सूर्य-चंद्राला माणसं आराध्यदैवत मानतात
रवी-तेजानं दिवस, चंद्रानं रात्री सुखावतात
उन्हाळ्याच्या रात्री आभाळ पांघरून गच्चीत
मस्त चंद्र-चांदण्यां, ग्रह-नक्षत्रांच्या सोबतीत
शीतल धुंद-मंद-उजेडात, गप्पांच्या ओघात
शांत झोपणं, एकमेव सुखद अनुभव सर्वात
मनभावन ती अप्रतिम अनुभूती बालपणीची
भावंडांसह धमाल करत टेरेसवर झोपण्याची
अजून ताजीतवानी, रंगून ऐकलेल्या गोष्टींची
घराच्या गच्चीवर, केलेल्या गमती-जमतींची
गणपती-पुळ्याला, सागरकिनारी चंद्र-दर्शन
काशीद-बीचला, उगवता सूर्य-मावळता चंद्र
लवासा येथील चंद्रासह चांदणी-सखी-दर्शन
नॉर्वेचे लोफोटेंन-आयलंड-तीन-समुद्र-संगम
थेट तीन सागरांच्या-संगमांच्या टोका-वरून
घेतलेलं ते न-भूतो-न-भविष्यति, चंद्र-दर्शन
सगळेच अनुभव, विलोभनीय-अविस्मरणीय
प्रत्येक आपापल्या परीने, अप्रतिम अद्वितीय
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply