कविता - 🌷 " विशेष ऋणानुबंध "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
गौमाता देते जणू तिचं सर्वस्व सात्विक दुग्ध-रूपाने ...
त्यात, दैवी-शक्तीचा-अंशही असतो" कल्पा "प्रमाणे ...
प्रत्येक गाय मुलत: असते सर्व-गुण-संपन्न-'कामधेनू' ...
तिने दिलेल्या दूध-दही-लोण्यानी पुलकित अणु-रेणु ...
तिच्या शुभ आशिर्वादांनी सर्व कामनांचा, होई अंत ...
आंतरिक"आत्मशुद्धी"मुळे, रूपांतरण-होते संत-महंत ...
वसू-वारस हा दिवस सोडता, सर्व विसरती गौचे ऋण ...
मातृ-पितृ-ऋणाच्या-इतकं, गाईचे स्थानही महत्व-पूर्ण ...
जसं कल्पतरुचं प्रत्येकच अंग-प्रत्यंग अत्यंत उपयोगी,
गोमातेची प्रत्येकच-गोष्ट-उपयुक्त सात्विक-जीवनदायी ...
दूध-साय-दही-ताक-लोणी-तूप-खरवस-गोमूत्र अन् शेण ...
गोमातेचे अनंत उपकार, केवळ अशक्य ते ऋण फेडणं ...
आईच्या-तोंडून ऐकलेली, लहानपणीची गोष्ट आठवली
घराच्या गोठ्यात परस-दारी, एक गाय होती आणलेली
आई रोज स्वतःच कपिलेची संपूर्ण सेवा मनोभावे करी ...
कपिला पण न बोलता, तिचं प्रेम डोळ्यांतून व्यक्त करी ...
कधी कधी ती आईला-छान हंभरुन हुंकार भरुन दाखवी ...
प्रत्यक्ष न बोलताही डोळ्यांनी, सांगतसे-आईला-सर्वकाही ...
कपिलेच्या डोळ्यांत सदाच तरळे मूक-कृतज्ञतेची झाक ...
आईच्या वागण्यात-स्पर्शात सदैव नितांत वात्सल्य-भाव ...
गाय जणू काही होती, पूर्व जन्मीची कुणी सखी-सोबती ...
नेहमी वाटे, नक्की विशेष-ऋणानुबंध असावेत काहीतरी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply