कविता – 🌷 ” स्वयंसिद्धा “

कविता - 🌷 " स्वयंसिद्धा “ 
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

'ॐ कालरात्र्यै नम:।'
’ॐ ह्रीं श्रीं क्लीं दुर्गति नाशिन्यै महामायायै स्वाहा।'

दुर्गेचा सप्तम् अवतार आदि-पराशक्ति
गळ्यामध्ये मुंडमाळा, रुद्रावतार घेई ती
काली, महाकाली, चामुंडा, चंडी, भैरवी
ही नावे तिची,अतिउग्र-रूपे-विनाशकारी

"काल" म्हणजे शिव, त्याची पत्नी "काली"
काळ म्हणजे मृत्यू म्हणूनही नाव " काली"
अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारी," काली"
असुरांचा कर्दनकाळ ती, म्हणून कालरात्री

दुर्गेचं हे सातवं स्वरूप, उंच-निंच अन् भव्य
काळा-कभिन्न वर्ण, परि अंगांग असे दिव्य
दुष्टांचा विनाश एकच लक्ष्य जणू एकलव्य
वध करी खलांचा, ती चोख बजावी कर्तव्य

चतुर्भुजा देवी ही, होते फक्त रात्रीच सक्रिय...
निप्पात-राक्षसांचा जे जे असती क्रूर-निर्दय...
गर्दभ असे तिचे वाहन, जे तिला अत्यंत प्रिय...
पति देवाधिदेव-महादेव,जे प्राणाहूनही प्रिय...

देवीची पूजा-प्रार्थना-मुहूर्त फक्त रात्री...
साधकाचं सदैव ध्यान, सहस्रार-चक्री...
भक्तांना करीते निर्भय, देई कृपासिद्धी...
प्रतिकूलता, भय, दु:ख यापासून मुक्ति...

देवीच्या पूजनाने, हरतील सर्व बाधा
नकारात्मक व्यक्ति बने सरळ-साधा
"शुभंकरी" नाव तिचे असे स्वयंसिद्धा
रक्त प्राषून वधिला असुर "रक्तबीजा"

यम-सदनी धाडले असुरां, करुनी बेजार
दुर्गेची सगळी रूपे या कामी आली फार
कालरात्रीची पूजा जो नियमाने करणार,
निडर होतो तो, विचार पोहोचून "सहस्रार"...

🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!