कविता – 🌷 ll ” तथास्तु ” ll
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १२ जानेवारी २०१७
जीवनातील सुंदरशी ती शिकवण,
अशाप्रकारे मिळता, मन आनंदलं
अनामिक-अनुभूतीनं, प्रसन्न झालं …
आधी फुल-वाल्याला विचारुन ठेवलेलं
” येथे सात्विक-अन्न, कोठेसं मिळेल? “
गेलो त्यानं सांगितलेल्या,भाटिया- लॉजला
स्वच्छ पण छोटेखानी,धाब्याटाईपची जागा
प्रवेश-द्वाराजवळ,एक वयस्क गृहस्थ उभे होते,
आम्हाला पाहून,शुभ-आशीष वरदहस्ताने दिले
शिर्डीभर सर्वत्र मागणारे हातच दिसले होते,
हे गृहस्थ,काही न मागता,दुवा मात्र देत होते
सहजपणे मी त्यांना म्हटलं, ” बाबा, कुछ खाओगे ? “
उत्तराची वाट न पाहता, रेस्टॉरंटच्या मालकाला,
सांगीतलं,” या बाबांना व आमच्या मामा ड्रायवरला,
जे जे हवंय ते सर्व द्या पण बिल, माझ्या बिलात टाका “
सर्वांचं व्यवस्थित खाऊन झाल्यावर, स्वादिष्ट-सात्विक पदार्थांवर ताव मारून,
मालकाला”शुक्रियां” बोलून बिल भरून, जात असताना, तो मालक म्हणाला,
मॅडम, यह बंदा यहां हररोज है होता, कई सालोंसे हम सबने उसे है देखा …
पर आज तक कभी, अंदर नहीं आया–न कभी उसने कुछभी मांगा या खाया …
दुवांए सदा वो हर-एकको देता रहेता है …आपपर उपर-वालेकी मर्जी जरूर है
तेव्हा माझ्या “अहो-आई “म्हणाल्या, लगेच
” तथास्तु ll “
त्यानंतर मस्त मजेत, आमच्या गतीने, मुंबईस
दहा दिवसांची नाशिक- शिर्डी- सहल करून,
अध्यात्मिक-अनुभवानं अधिक श्रीमंत-होऊन,
ताजे-तवाने होऊन,पुनः रुटीन मधे झालो व्यस्तं …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply