कविता -🌷 ll” ओजस्वी विचार-सरणी “ll

कविता -🌷 ll” ओजस्वी विचार-सरणी “ll
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १३ जानेवारी २०१७

स्वामी विवेकानंदांचा १५३ वा,वाढ-दिवस,
१२ जानेवारी, हा आहे त्यांचा,जन्म-दिवस,
तो, साजरा करतात,नॅशनल-यूथ-डे म्हणून

उत्तम,छाप पाडणारं,उमदं असं व्यक्तिमत्वं,
इंग्रजी, बांगला,हिंदी,भाषांवर प्रचंड प्रभूत्वं …
बुद्धिचं प्रखर तेज रामकृष्णांचं पट्ट-शिष्यत्व 

एकमेव-अद्वितीय-अशी, उदंडं- स्मरण-शक्ति
त्यांना प्रिय,होतं इंग्लिश-लिटरेचर,फिलॉसॉफी
ओजस्वी विचार-सरणी, नीटसर केली मांडणी 
पेंटर-कवी-गायक-वक्ता म्हणून उत्कृष्ट कामगिरी 

या सगळ्या गोष्टींचं समीकरणं म्हणजे स्वामी विवेकानंद 
त्यांचं मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्ता वडिलोपार्जित-होती सुबत्ता

भाषणात त्यांचं व्यक्तिमत्व, अन् सडेतोड विचार-मांडणं,
विषयाचा सखोल अभ्यास अवाक करेल,असं वाक-चातुर्य 
होऊन मंत्र-मुग्ध, प्रेक्षक-वर्ग तासंतास खिळून राही ऐकत …

प्रेक्षक-वर्ग, कोलकाताचा असो, मुंबापुरीचा किंवा शिकागोचा 
असो जगातील कोणत्याही देशाचा, प्रांताचा, जातींचा-धर्माचा 
संपूर्ण व्यासपीठ काबीज करुन, मुद्देसूद बोलत त्यांचं भाषण 
हातोटी अशी की सर्वांना तंतोतंत पटायचं त्यांचं सगळं सांगणं 
अत्यंत सोप्या,ओघवत्या भाषेत शिकवणं …
जातीयवाद,गरीब- श्रीमंत भेदाभेद करणं …
त्यांना अमान्य होतं,त्याचं उच्चाटन करणं,
हे त्यांचं प्रमुख-जीवन-ध्येय, साध्य करणं …

२१ व्या शतकातही त्यांचा प्रचंड प्रभाव आहे
तरुण-पिढी बदलण्याची,घडवण्याची ताकद 
त्यांच्या विचारांत,शब्दांत,वाणीत,नक्की आहे
एक आधुनिक विचारांचे,आदर्श- नेता आहेत …

त्याकाळी सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक,
अरविंद,म. गांधी, टागोर-जागतिक नेते व लोक
स्वामींमुळे प्रभावित होऊन सर्व कामात कार्यरतं 

त्यांनी,१८९३मध्ये विश्वं-समधर्म महा-सभेत,
भारताच्या सनातन धर्माचं केलं,प्रतिनिधित्व
“माझ्या अमेरिकी बंधू-भगिनिंनो,”या वाक्यात,
७००० उपस्थित लोकांची मनं, घेतली जिंकून

परिपूर्णतेनं,भारतीय वेदान्ताचं,दर्शन घडवून,
अमेरिका-युरोपच्या क्षितिजावर,केला प्रसार 
संपूर्ण जगभर,हिंदुत्वाच्या प्रेरणेचं,उच्च-कार्य
जगभर मान्यवर संस्थांनी त्यांचा केला  गौरव

स्वामींना,त्यांचे विचार मांडण्या,आमंत्रित केलं 
हारवर्ड युनिव्हर्सिटीत,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
करून विवेकानंदांनी भारतीय प्राचीन विचार 
वेदांत-प्रतिमा किती थोर,मांडली स्पष्ट रुपात

वेस्टर्न-वर्ल्डला वेदान्त-ज्ञानाची तोंड-ओळख
हिंदुत्वाची जगाच्या कोना-कोपऱ्यात, ओळख
११सप्टेंबरच्या,त्याप्रसिद्ध भाषण-स्मृतीप्रित्यर्थ
तो दिवस साजराहोतो,”वर्ल्ड-ब्रदरहूड-डे “म्हणून

त्यांनी ठाम-पणे जगभर हे मांडंलं, ज्याप्रमाणे सर्व नद्या व त्यांचे स्रोत
शेवटी सागरातच जाऊन मिळतात,सर्व धर्मांची शिकवणही त्याप्रमाणे 
अंती त्या परम-आत्म्याकडेच न्हेेते, यातून मानवी-जीवनाची प्रगती होते

अशी महान विभूती हजारो वर्षात एकदा,
जन्म घेते, मानव-जातीचा उद्धार करण्या
या महान युग- पुरुषाच्या आयुष्याचा उत्तरार्ध,
त्याचा विशेषसा-तपशील येईल पुढील भागात 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆














Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!