तारिख – शनिवार, १५ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷” ॠणानुबंध “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
बरीच वर्ष जुनी, ही गोष्ट आहे, गौतमची …
जेव्हा तिचं आँफिस फोर्टला होतं तेव्हाची …
फोर्टला तिच्या आँफिसमधे,
चार डेलिव्हरी-बाँईज होते …
त्यापैकी एक होता गौतम …
त्याचं खरं नाव होतं,संजय …
पण सर्रास वापरातलं,त्याचं
नाव मात्र, गौतमच होतं …
थेट वाईहून मुंबापुरीला,
नोकरी शोधत, आलेला …
नुकतच मिसरूड फुटलेला,
अगदिच एकोणीस वर्षांचा …
स्वभावानं गरिब,भोळा-भाबडा …
बिल्कुलच छक्के-पंजे नसलेला …
त्याचं स्वच्छ, सरळ वागणं-बोलणं,
थेट भिडलं, म्हणून त्याला निवडलं
खूष होऊन, तो चक्क, तिच्या पाया पडला
त्यामुळे, तिला आश्चर्याचा धक्काच बसला
आँफिसमधे असं घरासारखं वागायचं नाही,
अशी तंबी भरून,त्याची तिने बोळवण केली
अन्य स्टाफला त्याला शिकवायला चार गोष्टी
सांगून,याची निवड करुन चूक तर नाही केली,
अशी एक शंका तिच्या मनात डोकावून गेली …
गौतमसाठी” मँडम “म्हणजे,एक आदर्श,
त्यांचा शब्द म्हणजे,राजाचं जणू फर्मान …
त्याला काम दिलं,की फत्ते होण्याची निश्चिंती
तो करी ते,ईकडची दुनिया तिकडे झाली तरी
कितीही गडबड अथवा गोंधळ असला जरी
एकदा भारत-बंदचा दिवस होता …
परदेशी-कंपनीला माल हवा होता,
तिने गौतमवर सोपवली होती ती, कामगिरी,
ह्या पठ्ठयाने शक्कल लढवून,केली डेलिव्हरी
आणि तिच्याकडून”शाबाशी” मिळवली होती
ते रंगवून सांगताना तो होतो,तल्लीन आजही
ॠणानुबंध असल्या शिवाय, आपसात काही …
भेटत नाहीत माणसं,या जन्मी,कोणी कोणाही …
अधिक वर्णन, पुढच्या भागात करूया …
तोपर्यंत सर्वांना ” शुभ-रजनी ” चिंतुया …
@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🌅🕉🌷🙏
Leave a Reply