
कविता : 🌷 " होता होता होईल पहाट "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आशा-निराशेच्या लपंडावात
आनंदाची येईल लाट,
होता होता होईल पहाट...
मिट्ट काळोखी विशाल रात
शुक्र लपला घनतमी दाट,
होता होता होईल पहाट...
चंद्रमा उगवता नभात
नजरेचे संकेत घालती साद,
होता होता होईल पहाट...
चंदेरी आकाशाने गात-गात
अवघ्या तिमिरावर करता मात,
होता होता होईल पहाट...
भ्रमरानेही वाट पाहात
कमळ-मिठीच्या अंतरंगात,
होता होता होईल पहाट...
दवबिंदूंनी दाटी केली...
तांबडं फुटता कळी हसली,
निशेने ही टाकली कात...
होता होता होईल पहाट...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply