कविता :🌷 ‘ हुरहुर ‘

कविता :🌷 ‘ हुरहुर ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, ८ जुलै २०२३
वेळ : दुपारी २ वाजून ५३ मि.

रुणुझुणु पैंजण पायी वाजती
हृदयामध्ये निनाद होती
मधुर स्वर ते झंकारले 
गं काय करु आता काही न कळे || धृ ||

बासरीची सुरेल मंजुळ बोली
समजून राधा झाली बावरी
संदेशाने लाजून लाली
हुरहुर मनीची गाली पसरे 
गं काय करु आता काही न कळे || १ ||

हळुहळु सावळी सांज आली 
पाखरांची किलबिल वाढू लागली
घरट्यात पिलांना भूक लागली
पंखात पिलांची ओढ खेचते
गं काय करु आता काही न कळे || २ ||

यमुना जळी प्रतिबिंब बघुनी
चंद्र नभीचा गेला लपूनी
चांदण्यांशी खेळ खेळुनी
प्रितीचा प्रकाश त्यातून झळके 
गं काय करु आता काही न कळे || ३ ||

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!