कविता : 🌷 ‘ -हास  ‘

कविता : 🌷 ' -हास  '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ जून २०२४
वेळ : दुपारी, ४ वाजून ४७ मि.

आजवर पचवले की घावांवर-घाव
पण आज सर्वतोपरि पराभूत भाव
परास्त मन-स्थिती व हरलेला डाव
जणू चोर सोडून, पकडण्यास साव

कळसूत्री बाहुलीसम नाचवी नियती
की पूर्वसंचित, गत-पापांची-कर्मगती
कुणी सोईस्कररित्या म्हणे साडेसाती
दरवेळी काळजास अनंत चिरे‌ पडती

सतत भिरभिरे डोक्यात विचारांचा भुंगा
वयापरत्वे शरिर गलितगात्र-मनाचा दंगा
हातातोंडाशी असे सुग्रास सुखाचा घास
टपला कळी जणू करण्यास-संपूर्ण-हास

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!