कविता :🌷’ हवंहवंसं ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
विसरुच शकत नाही
ते बालपणीचे सवंगडी…
मंतरलेले दिवस असे की
कधी संपूच नयेत मुळी…
नवे बूट घालून पावसाळी
साचलेल्या पाण्यात उडी…
त्याशिवाय पाऊलही पुढे
कधी टाकणेच शक्य नाही…
खेळत-बागडतच शाळेत
बसायचं कायम कुडकुडत…
मग खाणाखुणा करत-करत
दंगा-मस्तीस नसायचा अंत…
निरामय असं ते शालेय जीवन,
आठवून क्षणिक मन थबकतं…
जमलेल्या जणू घट्ट दह्यासमान
आजही हवंहवंसं वाटत राहतं…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply