कविता – 🌷 ” स्वर्ग-सुख “


कविता - 🌷 " स्वर्ग-सुख "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

" मोगरा फुलला, मोगरा फुलला "...
फुले वेचिता बहरू कळियासी आला...

ज्ञानेश्वर माऊलींची अजरामर रचना ही,
कालातीत भक्ति-रसात चिंब भिजलेली...

मोगरा ...

श्वेत-वर्ण सुगंधी दरवळ, मन मोहवणारा...
सुवासात एकमेव, तो अनभिषिक्त राजा...
चंद्रासम-शुद्ध-शुभ्र, आसमंत-दिपवणारा...

जेंव्हा तन-मन-धन रुपी भक्तीचा मोगरा...
मन:पूर्वक समर्पण केला जातो परमेश्वरा...
खात्रीने चुकू शकतो जन्म-जन्मांचा फेरा...

सुरंगी ...

अन्य फुलांच्या तुलनेत रूपानं थोडी डावी...
पण सुगंधाने मात्र एकदमच बाजी मारली...
गज-यात गुंफून सुरंगी नेहमी जाते माळली

अप्रतिम सुंदर फुलांनी मन पुरतं प्रसन्न होतं...
नुसत्या सुगंधीत आठवणींनी, चित्त भारावतं...
त्या भारावलेल्या अवस्थेत स्वर्ग-सुख लाभतं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!