कविता - 🌷 " स्वर्ग पृथ्वीतलावरील "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २४ एप्रिल २०२४
नेहमी असं कानावर पडलंय की,
" मेल्या-शिवाय स्वर्ग मिळंत नाही "
जिवंतपणी मरण काय कळत नाही
कुणी म्हणेल की नदीचं पाणीही
पुढे- पुढेच धावत राहणार नेहमी
कधीच मागं वळून बघतही नाही
जिथे नाळ कापल्यानंतर ही बाळ आईला
विसरुन जात नाही, उलटपक्षी जन्मदात्या
माऊलीचे ऋण फेडण्यासाठी त्या जिवाला,
चैनही पडत नाही, स्वस्थही बसू देत नाही
तेंव्हा मनो-मनी पक्की खूण-गाठ पटते की,
कदाचित स्वर्ग, आता काही फार दूर नाही
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply