कविता : 🌷 ‘ स्वराई ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : ८ फेब्रुवारी २०२३
वेळ : रात्रीचे १२ वाजून ४३ मि.
स्वरांवर तरंगत-तरंगतच आपण वाढलो
सुस्वर कानावर अलगद पडत होते अन्
संगीताचे आपसूक संस्कार ही होत होते !
त्यामुळे सुरांची जाण आपोआपच आली
गानशूर-कम-कानशूर तरी नक्की झालो…
याचं बरचसं श्रेय द्यायला हवं ‘स्वराई’ ला !
एक जन्म-दाती माऊली-जी आपली आई,
ही स्वर-ज्ञान देणारी माऊली-म्हणून ‘स्वराई’
कसे बरं होणार आपण या दोघींचे ‘उतराई’ ?
सुरेल स्वरांनी, श्रोत्यांना प्रशिक्षित करून,
कैक पिढ्या गेल्या ‘स्वराईच्या हाताखालून’
गर्व वाटतो आपणही त्यापैकीच एक म्हणून !
तारुण्यात याच स्वरांनी अदृष्य साथ दिली…
प्रेमाची माधुरी वाढली, उमटली गाली लाली
तरुणाईचा आविष्कार-स्वरांची बहार आली…
जसं हवा-पाणी-अन्न-निवारा व प्रकाश हवा,
निकोप प्रकृतीसाठी, हवा स्वरांचा शिडकावा…
तेव्हा मनात झोके घेऊ लागतो पक्षांचा थवा !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply