कविता : 🌷 ” स्मृती-गंध  “


कविता : 🌷 " स्मृती-गंध  "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

गारठलेल्या पहाटे सुटला स्मृती-गंध मोकाट
मनी अनंत-अगणित आठवांची दाटी अफाट

गतस्मृती चिंब चिंब भिजवूनही, ऊबच देतात
हळुवार स्पंदनांनी झंकारुन, फुंकर घालतात

एकदा मागोवा घेत-घेत, हळूहळू डोकावताना
चंद्राळलेल्या उजेडात, आसमंत सजीव झाला

किती जरी प्रेम, माया, आपलेपणा जिव्हाळा
नातं जुळता जुळेनाच योग्य योग आल्याविना

प्रारब्धातील शाप-उ:शाप-वरदानांनी उफाळून
हृद्य-नात्यांतही भाग्य-ठरवतील, दान झुगारून

व्याकुळ जीवाची व्याकुळता, कोणा ना उमजे
दु:खाचे पदर खुलतच जातात, कोमल कोवळे

वाकुल्या दाखवीते क्षितीज, सोनेरी किरणांनी
स्मृती-गंध दरवळणार, प्रत्येक क्षणा-क्षणातूनी...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!